चिंचलखैरेच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:12 PM2021-03-11T22:12:38+5:302021-03-12T00:36:00+5:30

इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे.

Furnished building for Zilla Parishad School, Chinchalkhaire | चिंचलखैरेच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत

इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे शाळेच्या इमारतीच्या उद‌‌घाटनप्रसंगी मान्यवर.

googlenewsNext
ठळक मुद्देया इमारतीचे उद‌्घाटन नुकतेच झाले.

इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे. या इमारतीचे उद‌्घाटन नुकतेच झाले.

ज्योतिर्मय फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र वडनेरे, डॉ. प्रशांत मोरे, मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, शिक्षक हौशीराम भगत, भाग्यश्री जोशी, नामदेव धादवड, प्रशांत बाबळे, योगेश गवारी यांनी गेल्या वर्षभरापासून नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे शाळेच्या सुसज्ज इमारतीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला प्रतिसाद देत नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेच्या सात खोल्या, स्वयंपाक खोली, संगणक कक्ष, लॅबोरेटरी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या इमारतीचे उद्घाटन युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे (चेन्नई) जनरल मॅनेजर

वाय.के.सिमरे यांनी प्रत्येक वर्गशिक्षकाला दालनाची चावी देऊन केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत मोरे यांचे तर्फे शाळेला बेंच व ग्रीन बोर्ड भेट देण्यात आले. (वा.प्र.)

इन्फो
सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तत्पूर्वी, गावकऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. यावेळी कंपनीचे
के.वी.आर.कृष्ण, बी.स्वामीनाथन, अनिल नरोलीया, नाशिक विभाग प्रमुख

मंगेश मिलखे, वाणी, ज्योतिर्मय फाउंडेशन अध्यक्ष नरेंद्र वडनेरे, विस्तार अधिकारी अशोक मुंडे, केंद्रप्रमुख राजाराम जाधव,मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे,सरपंच मंगाजी खडके,उपसरपंच भाऊ भुरबुडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भुरबुडे, शिक्षक संघटनेचे झुंबर खेताडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Furnished building for Zilla Parishad School, Chinchalkhaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.