चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:19 AM2017-11-28T01:19:29+5:302017-11-28T01:23:23+5:30

सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघेही चामरलेणी डोंगरमाथ्यावर पोहचले; मात्र उतरताना उंचीवरून डोळे भिरभिरले आणि वाळलेल्या गवतावरून पाय घसरू लागल्याचे लक्षात येताच ते भेदरले व मदतीसाठी आक्रोश करू लागले. त्यांच्या मदतीसाठी एका युवकाने डोंगरावर धाव घेतली; मात्र पाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळला. यामुळे शाळकरी मुले अधिक भयभीत झाली होती.

 The furor of the escape of children stuck in Chamberlain | चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

Next
ठळक मुद्देपाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळलाशाळकरी मुले अधिक भयभीत झाली देवेंद्रचा पाय डोंगरावरून घसरला व तो खाली कोसळला

नाशिक : सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघेही चामरलेणी डोंगरमाथ्यावर पोहचले; मात्र उतरताना उंचीवरून डोळे भिरभिरले आणि वाळलेल्या गवतावरून पाय घसरू लागल्याचे लक्षात येताच ते भेदरले व मदतीसाठी आक्रोश करू लागले. त्यांच्या मदतीसाठी एका युवकाने डोंगरावर धाव घेतली; मात्र पाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळला. यामुळे शाळकरी मुले अधिक भयभीत झाली होती.  सिडकोमधील सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारे आर्यन गीते, नयन रोकडे, रोेहन शेळके, आदित्य खैरनार हे चौघे आपापल्या सायकलवरून चामरलेणीला सकाळी पोहचले. पायथ्याला सायकली उभ्या करून चौघांनी लेणीच्या पाठीमागील पायवाटेने चढण्यास सुरुवात केली. एक ते दीड तासात चौघेही लेणीच्या डोंगरमाथ्यावर पोहचले. दरम्यान, लेणी चढताना त्यांना भीती जाणवली नाही; मात्र माथ्यावर पोहचून खाली नजर फिरविल्यानंतर डोळे भिरभिरले आणि चक्कर येऊन पोटात भीतीचा गोळा उठला. यावेळी चौघांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला. सदर बाब तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिराच्या विश्वस्तांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ म्हसरूळ गावातील डोली सेवेकºयांना मदतीसाठी बोलावले. चौघा शाळकरी मित्रांचा आवाज ऐकून पायथ्याजवळ असलेले क. का. वाघ महाविद्यालयातील पदवीचे विद्यार्थी देवेंद्र जाधव, सौरभ पाटील या दोघा मित्रांनी लेणीच्या डोंगरमाथ्याच्या दिशेने धाव घेतली. लेणीच्या उतारावर असलेल्या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर देवेंद्रचा पाय डोंगरावरून घसरला व तो खाली कोसळला. हे बघून सौरभने तातडीने त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधून अग्निशामक दल व रुग्णवाहिकेची मदत मागितली. मित्र-मैत्रिणींनी तातडीने संपूर्ण घटनेची माहिती अग्निशामक दल व राज्य शासनाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला कळविली. काही मिनिटांतच पंचवटी उपकेंद्राचा बंब व रुग्णवाहिका लेणीच्या पायथ्याशी पोहचली. 
...अन् रेस्क्यू आॅपरेशनला आले यश 
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ जलद प्रतिसाद पथकाच्या कमांडो पथकाचे अधिक जवान पाचारण करण्याची सूचना बिनतारी संदेश यंत्रावरून दिली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही घटनेची माहिती घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कर्मचाºयांना रवाना केले. जलद प्रतिसाद पथकासह अग्निशामक दलाच्या जवानांनी  ‘मिशन रेस्क्यू आॅपरेशन’ डोंगरमाथ्यावर सुरू केले होते. डोंगरकड्यावरील दगडाच्या आधारे दोरखंड बांधून माथ्यावरून पुलीच्या सहाय्याने कमांडो जवानांनी अडकलेल्या चौघा शाळकरी मुलांना सुखरूपणे सपाट जागेवर उतरविले. साधारणत: पावणे बारा वाजता रेस्क्यू आॅपरेशनला सुरुवात करण्यात आली. दुपारी अडीच वाजता चौघांसह सौरभलाही पायथ्याशी आणले.

Web Title:  The furor of the escape of children stuck in Chamberlain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.