फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:07 PM2020-05-07T22:07:28+5:302020-05-07T23:49:04+5:30
नांदगाव : रेड झोनमध्ये असलेल्या नांदगाव शहरात दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्याने रस्ते दुतर्फा गर्दीने फुलले. सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन गळून पडले. कोरोनाची भीती अंतर्धान पावली. फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला. कर्णकटु हॉर्नचे कानठळ्या बसविणारे आवाज व भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनांनी कोरोना धाब्यावर बसवला. कालपर्यंत दुकाने उघडावीत की नाही याविषयी मनात धाकधूक होती. पण परवानगी असल्याचे नक्की कळाल्याने आज सर्वांनी दुकाने उघडली.

तोंडावरचे मास्क गळून पडले. दाटीवाटीने चालणारे पादचारी व हॉर्नच्या आवाजात, कोरोनाविषयी जागे करणारे नगर परिषदेचे ध्वनिक्षेपक शांत झाले.. गेला कोरोना.. कोरोना गेला. घरात बसून कंटाळा आला होता हो.. आज जरा पाय मोकळे करूनच येतो असे संभाषण करत नागरिक रस्त्यावर
आले.
महिनाभर पोलिसांच्या धाकाने सुनसान झालेले रस्ते गजबजले. यापुढे कोरोनाला घाबरायचे कारण नाही, अशी समजूत जणू नागरिकांनी करून घेतली की काय, असे वाटावे. इतपत भाऊगर्दी रस्त्यांवर जमा झाली. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घालण्यात आलेले नियम व बंधनांचा मागमूस आज उरला नव्हता.
गेल्या काळात दुकानदार व विविध व्यावसायिक यांचे आर्थिक चलनवलन बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन कधी संपतो व आपली उपजीविकेची साधने केव्हा सुरू होतात. हातातला पैसा संपला आहे. चलन फिरले नाही तर पुढे काय? या विचारांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्याचा परिपाक आज मोठ्या संख्येने वाहने व पादचारी रस्त्यावर येण्यात झाला. अनेक व्यावसायिकांनी थोडी फार तरी विक्र ी झाली. हातात पैसा आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.