नामकोच्या बारा माजी संचालकांचे भवितव्य छाननीत ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:56 AM2018-11-29T00:56:57+5:302018-11-29T00:57:12+5:30

नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक असताना विविध सहकारी बॅँका आणि वित्तीय संस्थांवर संचालक पद भूषविल्याचा ठपका असणाऱ्या बारा संचालकांना छाननीतच गारद करण्याचे प्रयत्न असून, संबंधित माजी संचालकांनादेखील त्याची कल्पना असल्याने गुरुवारी (दि.२९) होणाºया छाननीकडे बॅँकेच्या पावणे दोन लाख सभासदांचे लक्ष लागून आहे. या छाननीत मोठी कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.

 Future of 12 former directors of Nomak will be scrutinized | नामकोच्या बारा माजी संचालकांचे भवितव्य छाननीत ठरणार

नामकोच्या बारा माजी संचालकांचे भवितव्य छाननीत ठरणार

Next

नामको बॅँक निवडणूक

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक असताना विविध सहकारी बॅँका आणि वित्तीय संस्थांवर संचालक पद भूषविल्याचा ठपका असणाऱ्या बारा संचालकांना छाननीतच गारद करण्याचे प्रयत्न असून, संबंधित माजी संचालकांनादेखील त्याची कल्पना असल्याने गुरुवारी (दि.२९) होणाºया छाननीकडे बॅँकेच्या पावणे दोन लाख सभासदांचे लक्ष लागून आहे. या छाननीत मोठी कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.
नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून, मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक पूर्व प्रमुख पॅनलमध्ये समेट करून बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचे प्रयत्न फोल ठरले असले तरी खरी कसोटी छाननीच्या वेळीच लागणार आहे. नाशिक मर्चंट बॅँकेत संचालक पद भूषवित असताना अन्य सहकारी संस्थेत काम केल्याने आक्षेप घेण्यात आला होता. रिझर्व्ह बॅँकेने प्रतिकूल मत नोंदविल्याने संबंधितांवर टांगती तलवार असून, हे संबंधित माजी संचालकांनादेखील माहिती आहे. नामको निवडणुकीत याबाबत आक्षेप घेतला जाणार असल्याचे यापूर्वीच सर्वच संबंधितांची कायदेशीर तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. एका प्रतिस्पर्धी पॅनलचे उनेते तर मुंबईत विधीज्ञांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गुरुवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता नामको बॅँकेच्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांच्यासमोर छाननी होणार असून, त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तयारीत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी बॅँकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संंबंधित माजी संचालकांची नावे वगळावीत यासाठी आक्षेप घेण्यात आला होता. ही हरकत फेटाळण्यात आली असली तरी भविष्यात हा मुद्दा उभा राहणार हे लक्षात घेऊनच दोन्ही गटांनी काम करण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांकडून कागदपत्रे आणि सोयीचे उच्च तसेच सर्वाेच्च न्यायालयाचे दाखलेदेखील संकलित करण्यात आले आहेत. त्यामुळे छाननीतील लढाईदेखील रंजक ठरण्याची शक्यता आहे.
‘त्या’ उमेदवारांना माघार घेण्याची खेळी
छाननीनंतर माघारीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे छाननीनंतर आपल्या पॅनलला अडचणीत आणणाºया उमेदवारांना माघार घेण्याचीदेखील खेळी करण्यात येणार आहे.
नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीतील पॅनलची अद्याप घोषणा झाली नसली तरी ज्यांचा पॅनलमध्ये अधिकृतरीत्या सहभाग निश्चित नाही, अशांनीदेखील निवडणूक प्रचार सुरू केला असून, त्यांनी प्रमुख पॅनलच्या नावानिशी मतदान मागितले आहे.

Web Title:  Future of 12 former directors of Nomak will be scrutinized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.