गुणवंतांमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:30 AM2018-06-21T00:30:45+5:302018-06-21T00:30:45+5:30
रोटरी क्लब आॅफ देवळालीने विविध क्षेत्रांतील निवडलेल्या गुणवंतांमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या या गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले.
देवळाली कॅम्प : रोटरी क्लब आॅफ देवळालीने विविध क्षेत्रांतील निवडलेल्या गुणवंतांमुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या या गुणवंतांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्याने मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडिअर पी. रमेश यांनी केले. रोटरी क्लब देवळालीच्या वतीने मेसोनिक लॉज येथे पार पडलेल्या रोटरी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ब्रिगेडिअर पी. रमेश बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नल अशोक शिरगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष श्रुती मदान, राजू कटारे उपस्थित होते. यावेळी ब्रिगेडिअर पी. रमेश यांच्या हस्ते अनिरुद्ध अथनी, अनिता पगारे, डॉ. शिरीष घन, गोकुळ लोखंडे, वैभव गागे, प्रेम लुल्ला, योगेश गुप्ता, अक्षय रहाणे, सुनीता ताजनपुरे, बुद्धभूषण बोराडे, अनंत अथनी यांना रोटरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक शिरगावकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अरुण स्वादी व आभार मुरली राघवन यांनी मानले. यावेळी महाराज बिरमानी, कर्नल सुरजितसिंग, सुनीता आडके, अॅड. अशोक आडके, प्रमोद रहाणे, सुजाता रहाणे, संदीप ताजनपुरे, प्रशांत कापसे, ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष बोराडे, संध्या सुंदररामन, कमलेश वर्मा, संजीवनी बक्षी, डॉ. अलका स्वादी, विजय शेट्टी, निवेदिता अथनी, अश्विनी शिरगावकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.