भावीपिढीने घेतली सैन्य दलाची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:30 PM2020-01-15T23:30:13+5:302020-01-16T00:30:35+5:30

देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना केंद्रात सैन्य दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.१५) भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शित तोफा, मशीनगन, बंदूक आदींची माहिती जवानांकडून जाणून घेत लष्करी शिस्त अन् सामर्थ्यामधून सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची प्रेरणा घेतली.

Future generations take inspiration from the military | भावीपिढीने घेतली सैन्य दलाची प्रेरणा

भारतीय तोफखाना केंद्रात सैन्य दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनात तोफेची माहिती जाणून घेताना शालेय विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देतोफखाना केंद्र : सैन्य दिनानिमित्त प्रदर्शनाला भेट देत न्याहाळल्या तोफा अन् बंदुका

नाशिक : देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना केंद्रात सैन्य दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.१५) भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शित तोफा, मशीनगन, बंदूक आदींची माहिती जवानांकडून जाणून घेत लष्करी शिस्त अन् सामर्थ्यामधून सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची प्रेरणा घेतली.
दरवर्षी १५ जानेवारी रोजी सैन्य दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एक छोटेखानी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या केंद्रातून दरवर्षी शेकडो सैनिक देशसेवेत दाखल होतात. आधुनिक तोफा चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. भारतातील क्रमांक-१चे तोफखाना केंद्र म्हणून याची ओळख आहे. केंद्राच्या उमराव कवायत मैदानावर हाऊजर, बोफोर्स, रॉकेट लॉन्चर, १३० एम.एम. रशियन एम-४६ गन या तोफांसह रायफल, लहान-मोठ्या बंदुका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या तोफांची वैशिष्ट्ये यावेळी जवानांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. रॉकेट लॉँचरचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी किमान १४ अग्निबाण डागण्याची क्षमता थेट २० हजार ४०० किलोमीटरपर्यंत ठेवतो. बोफोर्स तोफ अत्याधुनिक असून, अतिउंच, डोंगराळ भागातील शत्रूंच्या तळावर उखळी मारा ही तोफ करते. बोफोर्स तोफ द्वार भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारत विजय मिळविला होता. तोफखाना केंद्रातील केंद्रीय विद्यालय, तोपची प्री-प्रायमरी आर्मी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, देवळाली कॅम्प, भोसला मिलिटरी स्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत प्रदर्शनाला भेट दिली.

जाणून घेतली सैन्य भरतीची माहितीं
प्रदर्शनादरम्यान भारतीय सेनेच्या भूदल, वायुदल, नौदलात भरती होण्यासाठी लागणारी शैक्षणिक, शारीरिक पात्रतेबाबतची सर्व माहिती यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच तीनही सैन्य दलाचे वैशिष्ट्यांसह त्यांची भूमिकादेखील यावेळी मांडण्यात आली होती. तोफखाना केंद्राची स्थापना १९४८ साली नाशिकरोडला करण्यात आली. या केंद्राचा इतिहास रेजिमेंट आॅफ आर्टिलरीच्या विकासाशी जोडलेला आहे. याबाबतही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. १९५० साली या केंद्राचे नाव इंडियन आर्टिलरी असे करण्यात आले. तत्पूर्वी रॉयल इंडियन आर्टिलरी सेंटर असे नाव होते. भारताच्या तोफा बघून विद्यार्थ्यांनाही अभिमान वाटला.

Web Title: Future generations take inspiration from the military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.