पोलीस अकादमीतील भावी ‘पीएसआय’ झाले ‘सैराट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:52+5:302021-03-28T04:14:52+5:30
महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि.२६) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी झालेल्या ...
महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांकरिता बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि.२६) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसचेही लसीकरण पुर्ण करण्यात आल्याचा दावा अकादमीच्या सुत्रांनी केला आहे. या साेहळ्याच्या समारोपनंतर शेकडो भावी उपनिरिक्षकांनी सोहळ्यादरम्यान मिळाले बक्षिसाचे स्मृतीचिन्ह घेत मंचावर धाव घेऊन एकत्रितपणे एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रम केला. यावळी कार्यक्रमात सहभागी पोलिसांनी गर्दी करत ‘सैराट झाल जी....’ या मराठी गीतावर समुहनृत्य केले. यावेळी कोणीही तोंडावर मास्क लावलेला नव्हता आणि सोशल डिस्टन्सही बाळगलेला दिसून आला नाही यामुळे सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याने नाराजीचा सूर सर्वत्र उमटत आहे.
--इन्फो--
उपनिरिक्षकांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल
भावी पीएसआय दर्जााच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आनंदात अतीउत्साही होत बेभानपणे एकत्र येत पोलीस अकदामीच्या सभागृहात ब्लेझर सूट परिधान करत जोरदार ‘डान्स’ केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियामधून शनिवारी सकाळी व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. दिवसभर सोशल मीडियामध्ये या व्हिडिओची चर्चा रंगल्यानंतर संध्याकाळी अकादमीकडून खुलासा करण्यात आला.
--इन्फो--
वरिष्ठांची पाठ फिरताच, झिंग-झिंग झिंगाट...
बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरुन सांस्कृतिक कार्यक्रमाची परवानगी देण्यात आली होती. हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांकडूनच आयोजित केला गेला होता. या संपूर्ण कार्यक्रमात कोविड लसीच्या दुसऱ्या डोस घेतलेल्या अधिकाऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली होती. बक्षीस वितरण समारोपनंतर वरिष्ठ अधिकारी परतल्यानंतर भावी पोलिसांनी एकत्र येत गर्दी केली आणि नृत्य केले. हे वर्तन अशोभनीय व चुकीचे असून याची विभागीय स्तरावर चौकशी केली जाईल, असे अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी खुलासा करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
---
२७ पोलीस डान्स नावाने फोटो आर वर सेव्ह केलेला आहे.
===Photopath===
270321\27nsk_35_27032021_13.jpg
===Caption===
कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करत भावी पोलिसांचा डान्स