गावठी कट्टे अन् जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:16 AM2019-04-20T00:16:47+5:302019-04-20T00:27:06+5:30

आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे.

 Gaddi shorts and live cartridges seized | गावठी कट्टे अन् जिवंत काडतुसे जप्त

गावठी कट्टे अन् जिवंत काडतुसे जप्त

googlenewsNext

नाशिक : आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे. ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात आचारसंहिता काळात चोख बंदोबस्त ठेवत ५० तलवारींसह पाच गावठी कट्टे, डझनभर जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
लोकसभा निवडणूक काळात कोठेही कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यादृष्टीने शहर व ग्रामीण पोलीस दक्षता घेत आहेत. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह, ग्रामीण सायबर पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून जिल्ह्यतील कुठल्याही कोपऱ्यात गुन्हे घडविण्याचा प्रयत्न होत असल्यास गुन्हेगारांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात विशेष पथके गस्तीवर आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून अद्याप जिल्ह्यातील ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ५७ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव पुढे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पेठ गावाजवळ निवडणूक आयोगाचे भरारी पथक व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत सुमारे १९ लाख रुपयांची रोकड एका मोटारीतून जप्त केली होती. तसेच अद्याप जिल्ह्यात विविध ठिकाणी चालणारे हातभट्टी दारूचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले असून आतापर्यंत २० हजार ८३६ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १७ लाख १४ हजार ८१३ रुपये इतकी आहे. तसेच जायखेडा शिवारात नंदुरबारच्या सीमेजवळ ग्रामीण पोलिसांनी २ हजार १५० जिलेटीन कांड्या व १ हजार ७५० डेटोनेटरचा साठा जप्त करत राजस्थानच्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. जिल्'ातील ३१८ गुन्हेगारांपैकी ३२२ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.
मोदींची सभा; यंत्रणा सज्ज
पिंपळगाव बसवंत येथे येत्या सोमवारी (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, सभास्थळी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान मोदी यांची सभा जिल्ह्यात होऊ घातल्याने साहजिकच सुरक्षाव्यवस्थादेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वैयक्तिकपणे चोख सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष देत संपूर्ण बंदोबस्ताची आखणी केली आहे. कुठल्याही प्रकारे बंदोबस्तात उणीव राहणार नाही, याबाबत ग्रामीण पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसून येत आहे.

Web Title:  Gaddi shorts and live cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.