गाडेकर मळा साईबाबा मंदिर वर्धापन

By admin | Published: November 23, 2015 10:59 PM2015-11-23T22:59:40+5:302015-11-23T23:00:29+5:30

गाडेकर मळा साईबाबा मंदिर वर्धापन

Gadekar Mala Saibaba Temple Anniversary | गाडेकर मळा साईबाबा मंदिर वर्धापन

गाडेकर मळा साईबाबा मंदिर वर्धापन

Next

दिननाशिकरोड : दत्तमंदिररोड गाडेकर मळा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारपासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता श्री साईबाबांची शाही पालखी मिरवणूक, शनिवारी सकाळी साईयाग होमहवन, यज्ञ, ११ वाजता मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. नवनाथ महाराज थेटे (गिरणारे) यांचे हरीकीर्तन होणार आहे. रविवारी दुपारी महाप्रसाद, रक्तदान शिबिर व सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे हरीकीर्तन व व्याख्यान होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ओम साई सेवा समिती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gadekar Mala Saibaba Temple Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.