गडकरींच्या हस्ते सोमवारी उड्डाण पुलाचे लोकार्पण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:10 AM2021-10-02T01:10:23+5:302021-10-02T01:11:49+5:30
केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी रविवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यात जनसंघाचे संस्थापक स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय थीमपार्क लोकार्पण सोहळा तसेच नाशिक तसेच सोमवारी आडगाव नाका ते जत्रा हॉटेल उड्डाण पुलाचा डिजिटल तंत्रज्ञानाव्दारे लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक : केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी रविवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यात जनसंघाचे संस्थापक स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय थीमपार्क लोकार्पण सोहळा तसेच नाशिक तसेच सोमवारी आडगाव नाका ते जत्रा हॉटेल उड्डाण पुलाचा डिजिटल तंत्रज्ञानाव्दारे लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी हे नाशिकमधील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी व उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यात जनसंघाचे संस्थापक श्रध्देय स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय थीमपार्क लोकार्पण सोहळा रविवारी (दि. ३) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानंतर नाशिक येथेच मुक्काम करून सोमवारी (दि.४) गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे आडगाव नाका ते जत्रा हॉटेल उड्डाण पुलाचे सायंकाळी ६ वाजता डिजिटल तंत्रज्ञानाव्दारे लोकार्पण सोहळा होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत असल्याची माहिती गिरीश पालवे यांनी दिली. या व्यतिरिक्त काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार असल्याचे पालवे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस आ. सीमा हिरे, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनील केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.