गडकोट, इतिहासाच्या छंदातून युवकाने शोधले उत्पन्नाचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 01:24 PM2020-01-09T13:24:56+5:302020-01-09T13:25:20+5:30
नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले.
नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले. नांदुरवैद्य येथील कु.प्रशांत लक्ष्मण धुमक या युवकाने याच मोबाइलचा सकारात्मक उपयोग स्वत: व इतरांना कसा होईल आणि त्यातून मराठी मुलखाचा इतिहास कसा अजुन जगप्रसिद्ध होईल या हेतुने बनविलेल्या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगातील हजारो, लाखो चाहते हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन करीत माहिती जाणून घेत आहेत. यासाठी यु ट्युबकडून प्रशांतला चक्क चाळीस हजार रूपयांचे बक्षीस देखील त्याला मिळाले आहे. यू ट्यूबवर अनेक प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघताना त्याला जाणवलं की यू ट्यूबवर एक असे साधन आहे ज्यामुळे आपल्याकडील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम होउ शकते. येथूनच सुरु वात झाली . स्वराज्याचा इतिहास या यु ट्यूबवरील चॅनेलची. इतिहासप्रेमी असल्यामुळे गडकोटांवर जाण्याची प्रचंड आवड असल्याने तेव्हा एका स्मार्ट फोनच्या साहाय्याने व्हिडिओ शूट करून आणि फोन मध्येच एडिट करून सर्व प्रथम आपल्या नाशिक शहरातील गडकोटांचे व्हिडिओ टाकले, त्यानंतर त्याने सातत्याने इतिहासावर व्हििडओ टाकायला सुरु वात केली.
आज अवघ्या दीड वर्षांनंतर चॅनेल वर ३० हजाराहुन अधिक सबस्क्रायबर आहेत तर ३०-४० व्हयूजवरून सुरु वात होऊन आज प्रविनच्या चॅनेलवर २४ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. या निमित्ताने स्मार्ट मोबाईलचा असा देखील उपयोग होऊ शकतो हे प्रशांतने सिद्ध करून दाखवले आहे.