अनकुटे-सावखेडे सोसायटीच्या  सभापतिपदी गायकवाड यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:12 AM2018-02-25T00:12:56+5:302018-02-25T00:12:56+5:30

अनकुटे-सावखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी प्रभाकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

Gaikwad elected as Chairman of Ankute-Savkhede Society | अनकुटे-सावखेडे सोसायटीच्या  सभापतिपदी गायकवाड यांची निवड

अनकुटे-सावखेडे सोसायटीच्या  सभापतिपदी गायकवाड यांची निवड

googlenewsNext

येवला : अनकुटे-सावखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी प्रभाकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सभापती भाऊसाहेब सोनवणे व उपसभापती पुंजाराम पगारे यांनी आवर्तन पद्धतीने पदांचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस ७ संचालक उपस्थित होते.  सभापतिपदासाठी प्रभाकर गायकवाड व उपसभापतिपदासाठी जिजाबाई गायकवाड यांचा प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. सचिव अरु ण दाणे यांनी मदत केली. निवड जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत व फटाके उडवत जल्लोष साजरा केला. याप्रसंगी रावसाहेब गायकवाड, संजय गायकवाड, धोंडीराम गायकवाड, विनायक पवार, निंबा गायकवाड, महेंद्र पगारे, बाजीराव पवार, शिवाजी गायकवाड, संदीप गायकवाड, अर्जुन गोरे, पुंजाराम पगारे, शरद गायकवाड, दत्तू गायकवाड, गोरख गायकवाड, संजय सोनवणे, वाल्मीक गायके, मंगल गायकवाड, अनिता गायकवाड, शोभा गायकवाड, शीतल गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: Gaikwad elected as Chairman of Ankute-Savkhede Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक