पोलिसांच्या त्रासामुळे गायकवाड कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा करंजखेड येथील घटना
By admin | Published: May 24, 2015 01:45 AM2015-05-24T01:45:18+5:302015-05-24T01:47:45+5:30
पोलिसांच्या त्रासामुळे गायकवाड कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा करंजखेड येथील घटना
नाशिक : करंजखेड येथील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत झालेल्या मारहाणीच्या प्रकारात घटनास्थळी उपस्थित नसतानाही आपल्यावर वणी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ ननाशी येथील युवक राहुल रघुनाथ गायकवाड याने कुटुंबीयांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात राहुल गायकवाड याने म्हटले आहे की, ११ मे रोजी करंजखेड येथे सरपंच व उपसरपंच निवडणुकीच्या दिवशी त्याचा भाऊ मनोेज रघुनाथ गायकवाड व इतर ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर रस्त्यावर उभे होते. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संगीता राऊत या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन येणाऱ्या गाडीचा धक्का मनोज गायकवाड याला लागला. या कारणावरून विचारणा करण्यासाठी राहुल गायकवाड याची आई ताराबाई गायकवाड व काका पोपट गायकवाड हे गेले असता त्यांना तेथील सात-आठ लोकांनी मारहाण केली. यावेळी आपण ननाशी येथे असतानाही या प्रकरणात आरोपी म्हणून आपले नाव वणी पोलिसांनी टाकले. आपले त्यामुळे कौटुंबिक स्वाथ्य बिघडून शैक्षणिक नुकसान झाले. आपण घटनेच्या वेळी उपस्थित नसतानाही आपले नाव या प्रकरणात गोेवण्यात आले असून, गुन्'ातून नाव न वगळल्यास आपण सर्व कुटुंबीयांसह एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्मदहन करू, यास सर्वस्वी वणी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)