कोट्यवधीचा अपहार करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 02:20 PM2020-01-29T14:20:27+5:302020-01-29T14:20:43+5:30
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केलेल्या कांदा, द्राक्षाची जवळपास ४ कोटी ६१ लाखांच्या रक्कमेचा परस्पर अपहार करणाऱ्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केलेल्या कांदा, द्राक्षाची जवळपास ४ कोटी ६१ लाखांच्या रक्कमेचा परस्पर अपहार करणाऱ्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाºया व दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा विजय मुन्नी राजन याला दि.२८ च्या पहाटे, मुंबई येथील राहत्या घरातून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकत अटक केल्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात फिर्यादी अजित लहानु पाटील रा. देवपूर ता. निफाड यांनी २० आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी विजय मुन्नी राजन (३२, रा, वडाळा, मुंबई व इतर तीन आरोपी विरु द्ध श्रीनाथजी अँग्रो, एक्स्पोर्ट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी द्राक्ष, कांदा विक्रीतुन आलेले ४ कोटी ६१ लाख रु पयांचा परस्पर अपहार करून फिर्यादिसह शेतकºयांच्या फसवणुकी प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित फरार असल्याने त्याचा शोध लागत नव्हता, मात्र गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला संशयित मुंबईत आल्याची माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक ग्रामिणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अरूंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय महाजन पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाने, अमोल जाधव, रमेश पाटील, तुषार झालटे आदींची टीम मुंबईत दाखल झाली. मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी सापळा रचून राजन यास वडाळा मुबई येथील राहत्या घरातून अटक करण्यात यश आले. फसवणुक झालेल्या फिर्यादीसह शेतकºयांना पैसे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.