विंचूर बँकेतील एटीएम फोडणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:57 PM2020-03-20T21:57:39+5:302020-03-21T00:34:15+5:30
विंचूर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली असून, गुन्हा उघड करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
विंचूर : येथील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली असून, गुन्हा उघड करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
लासलगाव पोलीस ठाण्याला स्टेट बॅँकेचे विंचूर शाखा व्यवस्थापक स्वप्नील अरुण सोनजे यांच्या फिर्यादीवरून ४,७५,५०० रुपयांची रक्कम चोरी केल्याबाबत दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत होते. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व आरोपी पळालेल्या दिशेने जाणाºया राज्यात नाकाबंदी करण्यात आली होती.
नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक मागावर असतानाच सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा करण्यासाठी यातील आरोपींनी आय ट्वेंटी नवीन कार वापरल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर माहितीच्या आधारे मध्य प्रदेशमध्ये जात असताना टिकमगढ येथील बल्देवगढ पोलीस ठाणे हद्दीत यातील गुन्ह्यातील संशयित साजीद मुस्ताक खान (२० रा. उटावर नगला, जि. मथवाराल, राज्य उत्तर प्रदेश), माजिद जुम्मा खान (१९ वर्षे, रा. पिंपरोडी, जि. नूह, राज्य हरियाणा), जितेंद्र ऊर्फ जितू शंकरसिंग ठाकूर (३० वर्षे, रा. बरोद, जि. ललितपूर, राज्य उत्तर प्रदेश), रोविन रहीस खान (२० वर्षे, रा. आलिमेव, जि. पलवल, राज्य हरियाणा), वसीम अकरम उत्तर हुसेन (२८ वर्षे, रा. टुंडदलाका, जि. नूह, राज्य हरियाणा) असे पाच जण सापडले. त्यांना बल्देवगढ पोलीस ठाणे, जिल्हा टिकमगढ, राज्य मध्य प्रदेश येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लासलगाव पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यातील गेलेल्या रोख रकमेपैकी ३ लाख ७५ हजार रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली आय ट्वेंटी कार, गॅस कटर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्ह्यांची कबुली
सदर गुन्ह्याचा लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने तपास चालू असताना यातील आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील एका स्थानिक आरोपीच्या मदतीने विंचूर, ता. निफाड व पिंपळगाव बसंवत, ता. निफाड येथे एटीएममधून पैसे चोरी केली असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी फरार असून, त्याचा शोध घेणे चालू आहे. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मागर्दनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल करीत आहेत.
स्थानिक गुन्ह्यांची कबुली
सदर गुन्ह्याचा लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने तपास चालू असताना यातील आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील एका स्थानिक आरोपीच्या मदतीने विंचूर, ता. निफाड व पिंपळगाव बसंवत, ता. निफाड येथे एटीएममधून पैसे चोरी केली असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी फरार असून, त्याचा शोध घेणे चालू आहे. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मागर्दनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल करीत आहेत.