शाळा प्रवेशोत्सवाने गजबजली ज्ञानमंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:14 PM2018-06-15T14:14:05+5:302018-06-15T14:14:05+5:30

पेठ - शाळेच्या दारापाशी रांगोळी, फुग्यांनी सजवलेले वर्ग आणी नव्याने दाखल होणार्या बालकांच्या स्वागताची व आगमनाची केलेली जोरदार तयारी यामुळे शाळेचा पिहला दिवस चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला.

Gajabjali knowledge filled with the school admissions | शाळा प्रवेशोत्सवाने गजबजली ज्ञानमंदिरे

शाळा प्रवेशोत्सवाने गजबजली ज्ञानमंदिरे

Next

पेठ - शाळेच्या दारापाशी रांगोळी, फुग्यांनी सजवलेले वर्ग आणी नव्याने दाखल होणार्या बालकांच्या स्वागताची व आगमनाची केलेली जोरदार तयारी यामुळे शाळेचा पिहला दिवस चांगलाच उत्साहात साजरा करण्यात आला. पेठ तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक, शासकिय व इतर माध्यमाच्या जवळपास २५० शाळा आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा प्रवेशोत्सव बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती झाल्याने शिक्षकांनी जय्यत तयारी केली होती. गावागावात मुलांचे सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तर ग्रामीण व दुर्गम गावांमध्ये पालकांनी चक्क आपल्या पाल्यांना पाठीवर व खांद्यावर बसून शाळेत दाखल केले. समग्र शिक्षा अभियान मार्फत पिहल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.तर विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दप्तर, वहया व शैक्षणकि साहित्य वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन उपक्र मात सहभाग नोंदवला.

Web Title: Gajabjali knowledge filled with the school admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक