ओझरला गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 03:15 PM2019-02-25T15:15:43+5:302019-02-25T15:16:06+5:30
ओझरटाऊनशिप : येथील उत्सव समितीच्यावतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची शोभायात्राही काढण्यात आली.
ओझरटाऊनशिप : येथील उत्सव समितीच्यावतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची शोभायात्राही काढण्यात आली. गण गण गणात बोते व श्री गजानन महाराजकी जय च्या जयघोषात गणपती मंदिर काँम्प्लेक्स मधील मंदिरात झालेल्या प्रकट दिन उत्सवात सकाळी श्री चे गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले. सांयकाळी साडेचार वाजता पादुकांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, उंट, घोडे, त्यांच्या मागे एच.ए.एल. कामगारांच्या एच.ए.ई. डब्लू आर.सी संस्थेचे पुरूष व महिलांचे आंतरनाद ढोल पथक, पुरूष व महिलांचे भजनी मंडळे, महिलांचे पथक, श्रीच्या पादुका असलेली पालखी व श्रीची प्रतिमा ठेवलेल्या विद्युत रोषणाई केलेल्या चित्ररथाचा समावेश होता. शोभा यात्रा टाऊनशिप मधील मुख्य मार्गावरून नेण्यात आली. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी सडामार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर झगमगुन गेला होता. शोभायात्रेत विदर्भ मित्रमंडळाचे आजी माजी पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीच्या पालखी दर्शनासाठी भाविकासह नागरिकांनी शोभायात्रा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रीची पूजा करण्यात आली. ११ वाजता एच.ए.एल.चे सी.ओ. शेषगिरी राव , महाव्यवस्थापक ए.बी घरड, हुलीराज, यु.बी.सिंग व शैलेन्द्र खपली , कामगार संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांचेसह मान्यवर अधिकारी यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. पुजारी पंकज पुराणिक व विशाल जोशी यांनी पौरोहित्य केले.