गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज घरोघरी प्रसादवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:55 PM2021-03-04T22:55:15+5:302021-03-05T00:46:50+5:30
नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसाद आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराजमंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसाद आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
दरवर्षी या मंदिरात प्रकट दिनाचा उत्सव केला जातो आणि पिठलं-भाकरीचा नेवैद्य दाखवून तो सर्व भाविकांना दिला जातो. यंदा मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता मंदिरात वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ महिला श्री गजानन महाराज विजयग्रंथाचे पारायण करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती व पूजा होणार असून, त्यानंतर तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी, पाटीलनगर, हेडगेवारनगर, कर्मयोगी नगर, कालिका पार्क या भागात घरोघरी भाविकांना घरपोच बुंदीच्या लाडूचा प्रसाद पाठवण्यात येणार असल्याचे चारूशिला गायकवाड, रवींद्र सोनजे, संजय टकले यांनी कळविले आहे.