ओझर येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात
By admin | Published: February 19, 2017 01:14 AM2017-02-19T01:14:23+5:302017-02-19T01:14:41+5:30
ओझर येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात
ओझरटाऊनशिप : येथील श्री गजानन महाराज उत्सव समितीच्या वतीने व एचएडब्लूआरसी संस्थेच्या सौजन्याने श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते तसेच श्रीच्या पालखीची भव्य शोभायात्राही काढण्यात आली. गण गणाते बोते व श्री गजानन महाराज की जयच्या घोषात गणपती मंदिर कॉम्प्लेक्स येथील श्री गजानन महाराज मंदिरात झालेल्या श्रींच्या प्रगट दिन उत्सवात शुक्रवारी (दि.१८) सकाळी ७ वाजता श्रीचे गजानन विजयग्रंथांचे पारायण झाले. पारायणासाठी भाविक मोठ्या संख्येने बसले होते. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या पादुका असलेल्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गणपती मंदिरापासून प्रारंभ झालेली शोभायात्राचे मुख्य मार्गावर ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. रस्त्यावर ठिकठिकाणी सडा-रांगोळ्या काढून, रोषणाईने मंदिर परिसर झगमगून गेला होता. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा व चौकाचौकात गर्दी केली होती. शोभायात्रेत विदर्भ मित्रमंडळाचे आजी -माजी पदाधिकारी, सेवानिवृत्त कामगार, उत्सव समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी पूजा व अभिषेकानंतर हजारो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.