जुगार अड्डा चालविणाऱ्या बागमारची धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:51 AM2018-11-06T00:51:57+5:302018-11-06T00:52:20+5:30
मनोरंजन क्लबच्या नावाखाली सर्रासपणे जुगार अड्डा चालवून तसेच पतसंस्थेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक करणारा संशयित कथित पत्रकार राहुल बागमार याची सरकारवाडा पोलिसांनी शहरातून रविवारी (दि.४) धिंड काढली.
नाशिक : मनोरंजन क्लबच्या नावाखाली सर्रासपणे जुगार अड्डा चालवून तसेच पतसंस्थेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक करणारा संशयित कथित पत्रकार राहुल बागमार याची सरकारवाडा पोलिसांनी शहरातून रविवारी (दि.४) धिंड काढली. सीमा परदेशी यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात बागमारविरुद्ध शुक्रवारी (दि.२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्यास अटक केली. चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत कर्ज देण्याच्या बहाण्याने शुल्काच्या नावाखाली बागमार याने परदेशी यांच्याकडून १२ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादित त्यांनी म्हटले आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी रविवारी संशयित बागमारची शहरातील अशोकस्तंभ ते पंचवटीपर्यंत ‘वरात’ काढली. तसेच गुन्हा घडला त्या पतसंस्थेत नेऊन चौकशीही केली. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी ही वरात काढण्यात आली. परिसरातील व्यावसायिकांच्या बागमार याच्याविरुद्ध काही तक्रारी असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी केले आहे.