खेळात रंगले चिमुकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:47 PM2019-05-07T17:47:10+5:302019-05-07T17:47:23+5:30

सिन्नर : परीक्षा आटोपून निकाल लागल्यानंतर मुलांचे आकाश मोकळे झाले आहे. त्यामुळे रोज शाळेत जायची कटकट संपल्याने निरागसपणे ही मुले त्यांच्या वयातील विविध खेळांचा निखळ आनंद घेतानाचे चित्र आहे.

The game sparked! | खेळात रंगले चिमुकले!

खेळात रंगले चिमुकले!

Next

सिन्नर : परीक्षा आटोपून निकाल लागल्यानंतर मुलांचे आकाश मोकळे झाले आहे. त्यामुळे रोज शाळेत जायची कटकट संपल्याने निरागसपणे ही मुले त्यांच्या वयातील विविध खेळांचा निखळ आनंद घेतानाचे चित्र आहे. शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या खेळांना पसंती दिली जात असल्याचेही दिसते.
पूर्वीच्या काळात करमणुकीची साधने नसल्याने आनंदासह विविध गुंणांचा विकास व्हावा व करमणूक व्हावी अशा दुहेरी उद्देशाने विविध खेळांची निर्मिती झाली आहे. परंतु कालौघात मागे पडलेले अनेक खेळ नव्याने सुरु झाले आहेत. ठिकठिकाणी डेरेदार वृक्षांच्या छायेत, मंदिरांच्या वºहांड्यात विविध खेळांचे डाव ग्रामीण भागात रंगू लागले आहेत. उन्हाळ््याच्या सुट्यांची पर्वणी लाभल्याने ‘धम्माल’ करण्यासाठी चिमुकले उन्हा-तान्हाचा विचार न करता जेवण विसरुन खेळात दंग झाली आहेत. सुटीची चांगलीच मेजवाणी मिळाल्याचा त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे.

Web Title: The game sparked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.