चोर-पोलिसांच्या पाठशिवणीचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:44 AM2019-01-10T01:44:20+5:302019-01-10T01:44:35+5:30
पंचवटी : वार बुधवार (दि.९).. वेळ मध्यरात्री १ वाजेची.. रस्त्यावरचे बहुतांशी पथदीप बंदच... स्थळ हिरावाडी परिसरातील शक्तीनगऱ तीन ते चार भुरटे चोर एका दुकानाचे शटर लोखंडी वस्तूने तोडत असल्याचा आवाज येतो अन् काही मिनिटातच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात़
पंचवटी : वार बुधवार (दि.९).. वेळ मध्यरात्री १ वाजेची.. रस्त्यावरचे बहुतांशी पथदीप बंदच... स्थळ हिरावाडी परिसरातील शक्तीनगऱ तीन ते चार भुरटे चोर एका दुकानाचे शटर लोखंडी वस्तूने तोडत असल्याचा आवाज येतो अन् काही मिनिटातच पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात़ यानंतर रंगतो चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेऴ पोलीस आल्याची चाहूल लागताच चोर पुढे व पोलीस मागे असा एखाद्या सिनेमाला शोभावा, असा प्रसंग रंगतो. अखेर या खेळात भुरट्या चोरांना अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याची नामी संधी मिळते़
पोलिसांनी चारही दिशेला पोलीस कर्मचारी पाठवून भुरट्या चोरट्यांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला़ मात्र भुरटे चोर इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी ठरले़ एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच काहीशी घटना बुधवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील शक्तीनगर परिसरात घडली़ या परिसरात एकदंत अपार्टमेंट असून त्यात इच्छामणी नावाचे गॅरेज आहे़ मध्यरात्री रस्त्यावरील सर्वच पथदीप बंद असल्याने भुरट्या चोरट्यांनी त्याचा फायदा घेत त्या गॅरेजचे कुलूप तोडले़ तर दुकानाजवळ दोन-तीन संशयित काहीतरी तोडत असल्याचा आवाज शेजारच्या इमारतीतील नागरिकांना आला़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली़ त्यानंतर हवालदार सुरेश नरवडे, महेश साळुंखे, विलास चारोस्कर, विष्णू जाधव असे परिसरात गस्त घालत होते. चोर आल्याची माहिती मिळताच काही मिनिटांतच ते घटनास्थळी पोहोचले.
पोलीस आल्याची कुणकुण लागताच एका संशयिताने त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला़ मात्र त्याने अंगात असलेले जॅकेट व टोपी फेकली. अर्धा किलोमीटरपर्यंत चोर पुढे आणि पोलीस मागे असा पाठलाग सुरू होता. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोर पसार झाला. त्यानंतर काही वेळात त्या दुकानाचे शटर तोडून आत लपलेल्या अन्य दोघांनी बाहेर कोणी नसल्याचे बघून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी हातात बॅटरी काठ्या घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र अंधार तसेच लगतच्या इमारती यामुळे चोरट्यांना लपायला जागा मिळाली व चोरटे पसार झाले.