सटाणा नगरपालिकेच्या घंटागाड्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 04:53 PM2018-09-14T16:53:30+5:302018-09-14T16:53:49+5:30
घनकचरा व्यवस्थापन : भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार
सटाणा : येथील नगरपालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सहा नव्या घंटागाड्यांचे लोकार्पण शुक्रवारी (दि.१४) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घालत नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
शहराचा वाढता विस्तार पाहता उपलब्ध असलेल्या घंटागाड्यांची संख्या तोकडी होती. नगराध्यक्ष सुनील मोरे,आरोग्य सभापती दीपक पाकळे यांचेसह नगरसेवकांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर अखेर सहा नव्या घंटा गाड्या सटाणा नगर परिषदेसाठी उपलब्ध झाल्या. नव्याने दाखल झालेल्या घंटा गाड्यांमुळे शहरातील घाण व कचरा उचलण्यासाठी मोठी मदत होणार असून या गाड्या शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरतांना ध्वनीक्षेपकावर नागरिकांना वर्दी देत कचरा टाकण्याचे आवाहन करतील.
यावेळी उपनगराध्यक्ष संगिता देवरे, गटनेते दिनकर सोनवणे, काका सोनवणे, राहुल पाटील, राकेश खैरनार, सभापती शमा मन्सुरी, नगरसेविका डॉ.विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, भारती सुर्यवंशी, सुवर्णा नंदाळे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर,दत्तुभाऊ बैताडे, दीपक जापानी,शालीमार कोर, अरिफ मन्सुरी आदी उपस्थित होते.
भाजपाचे टीकास्त्र
घंटागाड्या लोकार्पण कार्यक्र माला भाजपचे गटनेते महेश देवरे, नगरसेवक मुन्ना शेख , पुष्पा सूर्यवंशी , मनोहर देवरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. याबाबत महेश देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण व आपल्या सहकारी नगरसेवकांनी कार्यक्र मावर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष कोणत्याही कामात आम्हाला विश्वात घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली. घंटागाड्या कोणत्या पद्धतीने खरेदी केल्यात याची देखील आम्हाला माहिती दिली गेली नाही. याची सखोल चौकशी करू ,असेही देवरे यांनी स्पष्ट केले.