आदिवासी शेतकऱ्यांना चार लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:27 PM2020-07-24T21:27:44+5:302020-07-25T01:07:55+5:30
पेठ : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी काम व कागद उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका खासगी ठेकेदाराने १९ शेतकºयांचे जवळपास चार लाख रु पये हडप करून फसवणूक केल्याची तक्र ार पेठ पोलिसात देण्यात आली आहे.
पेठ : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी काम व कागद उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका खासगी ठेकेदाराने १९ शेतकºयांचे जवळपास चार लाख रु पये हडप करून फसवणूक केल्याची तक्र ार पेठ पोलिसात देण्यात आली आहे.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने फसवणूक झालेल्या शेतकºयांनी शुक्र वारी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांची भेट घेऊन तक्र ार दाखल केली. सन २०१९-२० मध्ये कृषी विभागामार्फत मंजूर झालेल्या शेततळ्याचे काम करून देण्यासाठी नाशिकच्या एका खासगी ठेकेदाराने मंजूर यादीतील शेतकºयांशी परस्पर संपर्क साधून शेततळ्यासाठी आवश्यक साहित्य व काम करून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी १५ ते २० हजार रुपये उकळवले. याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी, उपजिल्हाध्यक्ष युवराज भोये, तालुकाध्यक्ष अशोक गवळी, विजय धूम, कैलास भोये, निरगुडे, पूनम गवळी, नेताजी गावित, अंकुश चौधरी, ईश्वर पवार, योगेश पोटिंदे, गणेश सातपुते, देवीदास हाडस, गिरीधर चौधरी, सीताराम कामडी, सुरेश साबळे, नामदेव बागुल, हेमंत खंबाईत, यशवंत राऊत, हौसाबाई भोये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सहा ते सात महिन्याचा कालावधी लोटला तरी संबंधित ठेकेदाराने कामही पूर्ण केले नाही व पैसेही परत दिले नसल्याने संतप्त शेतकºयांनी आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट पोलीस स्टेशन गाठले. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक करणाºया ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.