युवकाला ऑनलाइन साडेचार लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:32 AM2021-10-29T01:32:32+5:302021-10-29T01:32:53+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लबाडांनी शहरातील एका युवकास सुमारे साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लबाडांनी शहरातील एका युवकास सुमारे साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी फोनवर संपर्क साधत ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला. हिरावाडी परिसरात राहणारे हेमंत खंडेराव सोनवणे (३१, रा. हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार त्यांना मे महिन्यात भामट्याने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. शेअर बाजारातील एका कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सोनवणे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा नफा होतो, असे सांगितले. नफ्याचे प्रलोभन दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर सोनवणे यांनी त्या लबाडाने सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने ४ लाख ६२ हजार २०७ रुपयांचा भरणा केला. मात्र, रक्कम जमा झाल्यानंतर भामट्यांनी संवाद थांबविला. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.