वडांगळीच्या शेतकऱ्यांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:06 AM2020-09-16T00:06:48+5:302020-09-16T01:03:17+5:30
सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना वैतागून वडांगळीकरांनी आज अभियंतादिनाच्या दिवशीच येथील वीज कंपनीच्या कार्यालयात जात अभियंता आर.जे.येवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

शेतकरी उत्तम खुळे, बापूसाहेब खुळे, बाळासाहेब खुळे, यशवंत आढांगळे, मिलिंद आढांगळे व इतर शेतकºयांच्या विहिरीवरील मोटरपंपसाठी वीजपुरवठा करण्यासाठी देव नदीलगत देवना शिवारात रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणचे
रोहित्र सतत जळत असून त्या
ठिकाणी दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दरवेळेस दिरंगाई होत असते. तीन महिन्यात १५ दिवसही या ठिकाणाहून वीजपुरवठा होऊ न शकल्याने अगदी पिण्याचे
पाणीही शेतकºयांना दुरून आणावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने
उघडीप दिल्याने पिकेही करपू लागली होती. कनिष्ठ अभियंता
येवले यांच्याकडे वारंवार मागणी करूनही हे रोहित्र बदलण्यासाठी त्यांच्याकडून पुरेशे प्रयत्न होत नाही, अशी भावना येथील शेतकºयांची झाली आहे.