इंधन दरवाढीच्या विरोधात नाशकात राष्ट्रवादी कॉँंग्रेसची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 04:18 PM2020-07-01T16:18:35+5:302020-07-01T16:21:07+5:30
नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमतिपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गुलाब पुष्प’ देऊन गांधीगिरी केली.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले.पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली.
आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, पुरु षोत्तम कडलग, डॉ. योगेश गोसावी, नंदकुमार कदम,विजय पवार, भास्कर भगरे, विलास सानप, संदीप अहिरे, भुषण शिंदे, गणेश गायधनी यांचे सह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.