शिवसेनेची गांधिगिरी : ‘ही कसली भाजपची लाट, डेंग्यूने लावली नाशिकची वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:22 PM2018-10-03T16:22:40+5:302018-10-03T16:25:54+5:30
डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामीऔषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. शहरातील रुग्णालये ओसंडून वाहत असून १ हजार ८५३ साथीच्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले असून १३६ रुग्ण डेंग्यू, स्वाईनफ्ल्यू सदृश्य असल्याचे निष्पन्न झाल्याचा सरकारी आकडा आहे.
नाशिक : शिवसेनेकडून ‘गांधीगिरी’ आंदोलनाची अपेक्षा खरे तर कोणी करू शकत नाही; मात्र बुधवारी (दि.३) विरोधी पक्ष नेत्याच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाच्या नगरसेवकांनी चक्क डोक्यावर गांधी टोपी परिधान करत राजीव गांधी भवनात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा देत आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदविला. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात प्रवेश करुन त्यांना याप्रकरणी जाब विचारला.
शहरात महिनाभरापासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामी औषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. शहरातील रुग्णालये ओसंडून वाहत असून १ हजार ८५३ साथीच्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले असून १३६ रुग्ण डेंग्यू, स्वाईनफ्ल्यू सदृश्य असल्याचे निष्पन्न झाल्याचा सरकारी आकडा आहे. शहरात साथीच्या आजारांसह डासांपासून फैलावणा-या आजारांनी नुसते डोके वर काढलेले नाही, तर संपुर्ण शहरालाच आपल्या घेºयात घेतले आहे; मात्र अशा अवस्थेतही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्तावलेला आहे. विलास शिंदे, संतोष गायकवाड, श्याम साबळे, डी.जी.सुर्यवंशी, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे,दिपक दातीर, दिलीप दातीर, भागवत आरोटे, राधा बेंडकुळे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनिता कोठुळे आदि उपस्थित होते.
असे झालेत आरोप
डुप्लीकेट डास प्रतिबंधात्मक औषधांचा फवारणीसाठी होतोय वापर.
फोटोसेशनसाठी स्वच्छता मोहिमेचा देखावा.
कामे केल्याचे फोटो आयुक्तांना पाठविण्याची अती घाई, नागरिकांना संकटात नेई.
प्रत्यक्षपणे कामे करण्यास, लोकजागृती, प्रबोधन करण्यास टाळाटाळ.
गावठाण, स्लम वसाहतींकडे दुर्लक्ष.
‘दत्तक पित्याचा आदेश’ सोपविला
महापालिकेच्या विरोधी पक्षाच्या हाती लागलेला उपरोधिक भाषेतील ‘दत्तक पित्याचा आदेश’ची प्रत यावेळी बोर्डे यांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सोपविली.आरोग्य प्रशासनाचा गलथान व निष्क्रीय कारभार नगरसेवकांनी बोर्डे यांच्या लक्षात आणून दिला. उपरोधिक आंदोलनानंतर शिवसेनेकडून ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करत बेजबाबदार अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा बोरस्ते यांनी दिला. तसेचमुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतरच खºयाखुºया औषधांचा वापर डास मारण्यासाठी करणार का? असा रोखठोक प्रश्नही विचारला. या उपरोधिक आंदोलनानंतर शिवसेनेकडून ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करत बेजबाबदार अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
--