येवल्यात खड्ड्याचा गांधीगिरीने वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 05:51 PM2021-01-17T17:51:47+5:302021-01-17T17:52:45+5:30
येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत केकही कापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या गांधीगिरीची शहरात चर्चा होत आहे.

शहरातील कोर्ट, कचेरी रोडलगत असणा-या वॉर्ड क्र. ३ परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत अनेकदा निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शाकीर शेख, शेरू मोमीन, धीरज परदेशी आदी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी करत खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी केकही कापण्यात आला. कोर्ट, कचेरी रोड या मुख्य रस्त्यावरून न्यायालय व पोलीस ठाणे, मुक्तीभूमी या निमित्ताने मोठी वर्दळ असते. प्रशासनाने तातडीने सदर रस्त्यावरील किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी यावेळी मोमीन यांनी केली.
या प्रसंगी दीपक काथवटे, बशीर पठाण, पापा शेख, सोनू पिंजारी, दर्शन भिंगारकर, अशरफ मोमीन, साजिद शेख, समीर सैय्यद, इरफान पठाण, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, अल्ताफ पठाण, सिद्धिक मोमीन आदी उपस्थित होते.