विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:30 AM2018-11-05T00:30:10+5:302018-11-05T00:30:26+5:30

भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.

 Gandhiji: Mishra is a flower of thought | विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

विचार तत्त्वांचे पुष्प म्हणजे गांधीजी : मिश्र

Next

नाशिक : भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अमरिश मिश्र यांनी केले आहे.  सार्वजनिक वाचनालयातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात महात्मा गांधी विचारमालेचे दुसरे पुष्प ‘गांधीजी, गवताचे एक लवलवते पाते’ विषयावर गुंफतांना मिश्र यांनी गांधी विचार आणि गांधीवादाचा दिखावा करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. व्यासपीठावर सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, वसंत खैरनार उपस्थिती होते. अमरिश मिश्र म्हणाले, गांधीजी केवळ व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गोष्ट नाही, तर गांधीजी हे एक विचार आहे. गांधीजी हे स्वातंत्र्याचे सर्वांत मोठे उद््गाते होते. त्यांच्याकडे मोठे जनसंघटन होते. ते नेहमी माणसांत रहायचे, त्यांच्या भल्याचा विचार करायचे. त्यामुळेच माझ्यामुळे दुसºयांना त्रास होऊ नये, असे आपल्याला वाटणे म्हणजेच आपले गांधीवादी बनणे असल्याचे मिश्र म्हणाले. प्रारंभी आस्था मांदळे हिने ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. सूत्रसंचालन हेमंत देवरे यांनी केले. प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. संजय करंजकर यांनी आभार मानले. हेमंत देवरे, वसंत खैरनार, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी.
मोठ्यांचे अनुकरण करावे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याविषयी बोलताना पुतळे उभे करून भागणार नाही. पुतळे उभारून काय होणार आहे, मोठ्या लोकांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title:  Gandhiji: Mishra is a flower of thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक