राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:17 AM2018-04-04T00:17:22+5:302018-04-04T00:17:22+5:30

सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली.

Gandhinagar nationalist Congress: Demand for road repair Plantation in the streets | राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण

राष्ट्रवादी कॉंग्रेसची गांधीगिरी : रस्ता दुरुस्तीची मागणी सटाण्यात रस्त्यात वृक्षारोपण

googlenewsNext

सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले. शहरामधून जाणार्या चौगाव रस्त्याची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तर चौगाव बर्डी पर्यंत मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.याबाबत संबधित बांधकाम विभागाकडे अनेक वेळा
तक्र ार करून रस्ता दुरु स्तीची मागणी केले.मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याकडे यंत्रणेने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी केली.तसेच इंधन दरवाढीचा देखील राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. आंदोलनात राजेंद्र सोनवणे यांच्यासह भिका सोनवणे ,माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे ,रत्नाकर सोनवणे ,झप्रिू सोनवणे, केशव मांडवडे, भास्कर सोनवणे, केशव सोनवणे, भिकन शहा, रवींद्र सोनवणे, विश्वास जोशी, भरत अहिरे, देवेंद्र सोनवणे, राजेंद्र कापडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Gandhinagar nationalist Congress: Demand for road repair Plantation in the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.