गांधीनगर संघाने मिळविला चाफळकर चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:50 AM2018-07-07T01:50:31+5:302018-07-07T01:50:36+5:30
नाशिकरोड : नाशिक जिल्हा अॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनतर्फे शिखरेवाडी येथील मैदानावर आयोजित स्वर्गीय भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषकाचे विजेतेपद गांधीनगर संघाने पटकाविले.
नाशिक जिल्हा अॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघासह
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, उमाकांत निखारे, सूर्यकांत पवार, अर्जुन टिळे, शैलेश ढगे, गुलजार कोकणी, निवृत्ती चाफळकर, सुनील ढगे, विलास गांगुर्डे, प्रशांत कापसे आदी.
नाशिकरोड : नाशिक जिल्हा अॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनतर्फे शिखरेवाडी येथील मैदानावर आयोजित स्वर्गीय भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषकाचे विजेतेपद गांधीनगर संघाने पटकाविले.
शिखरेवाडी मैदानावर नाशिक जिल्हा अॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशातर्फे कै. भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी गांधीनगर आणि नाशिकरोड बॉईज संघात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात गांधीनगर संघाने पॅनल्टी स्ट्रोकमध्ये विजय मिळविला.
पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत पवार, अर्जुन टिळे, शैलेश ढगे, गुलजार कोकणी, निवृत्ती चाफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेतेपदाचे पारितोषिक व १५ हजार रुपये रोख गांधीनगर संघास देण्यात आले. द्वितीय विजेतेपद नाशिकरोड बॉईज संघाला ११ हजार, चषक तर तृतीय एलएसजी संघाला आठ हजार रुपये व चषक देण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट गोलकिपर, बेस्ट डिपेन्स, बेस्ट फॉरवर्ड आदी पारितोषिकेदेखील खेळाडूंना देण्यात आली. पंच म्हणून जसबीर रंधवा, शेखर चौधरी, मनोज किर, अनिल जाधव, विक्रांत पवार आदींनी काम पाहिले. यावेळी असोसिएशनचे राजू शहाणे, श्रीकांत पवार, अनिल जाधव, राजेंद्र जठार, विलास गांगुर्डे, प्रदीप बागुल, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते.