भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:05 AM2019-08-10T00:05:10+5:302019-08-10T00:24:14+5:30

शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे.

Ganesh festival celebrated at Bhalekar Maidan | भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त

भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त

Next
ठळक मुद्देस्मार्ट पार्किंगचा अडथळा स्थायित ठराव, आयुक्त तपासणी करणार

नाशिक : शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे. स्मार्ट पार्किंग असलेल्या या मैदानावर खड्डे न खोदताच मंडप उभारण्याची हमी घ्यावी, असे समिती सभापती उद्धव निमसे यांनी शुक्रवारी (दि. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले, तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मार्ट पार्किंगच्या सेन्सरला धोका पोहोचणार असेल तर परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने आठ मंडळाच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध भागांत गणेश मंडळांना परवानगी दिली जाते. तथापि, आठ मंडळे हे भालेकर हायस्कूलच्या मैदानातच गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळांना गेल्यावर्षी या जागेत स्मार्ट पार्किंगचे काम सुरू असल्याने विरोधाला सामोरे जावे लागले होते. तत्कालीन आयुक्ततुकाराम मुंढे यांनी विरोध केल्याने मंडळांनी हा धार्मिक कार्यक्रम असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतली. महाजन यांनी मध्यस्थी केल्याने तिढा सुटला आणि त्याच जागेवर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. परंतु आता या जागेवर पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यास अडचण उद््भवत आहे. याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण झाल्याने आता याठिकाणी परवानगी देता येणार नाही असे पत्र पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नरसिंगे यांनी दिले आहे. यामुळे मंडळांनी स्थायी समितीकडे दाद मागितली. शुक्रवारी (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भात अशासकीय ठराव करण्यात आला. परंतु त्याचबरोबर आयुक्तांनी पाहणी करून निर्णय द्यावा, असे सभापती उद्धव निमसे यांनी सांगितले. विशेषत: खड्डे न करताही याठिकाणी मंडप उभारता येऊ शकतो, असे निमसे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम झाले आहे. त्यामुळे रिमोट सेसिंगला धोका पोहोचत असेल तर परवानगी दिली जाणार नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरवेळीच वाढणार वाद
स्मार्ट सिटीअंतर्गत भालेकर मैदानावर स्मार्ट पार्किंगचे काम करण्यात आले आहे. याठिकाणी रिमोट सेन्सिंगसह अन्य अद्ययावत यंत्रणा असल्याने आता दरवर्षीच गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ganesh festival celebrated at Bhalekar Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.