सराईत गुन्हेगार गणेश चांगलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:45 PM2017-07-22T16:45:39+5:302017-07-22T16:45:39+5:30

सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी ; गंभीर स्वरुपाचे गुन्हे

Ganesh Goodas arrested | सराईत गुन्हेगार गणेश चांगलेस अटक

सराईत गुन्हेगार गणेश चांगलेस अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व सराईत फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़श्रीरंग अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी,नाशिक) यास सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़ गत वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता़
गणेश चांगलेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून अंबड व सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता़ गत वर्षभरापासून पोलिसांना चांगले हा चकमा देत होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा पूर्व तयारी, लूट, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे चांगलेवर दाखल असून त्याच्याकडून गावठी कट्टे व जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहे़ सरकारवाडा, अंबड अशा विविध पोलीस ठाण्यांतील तेरा गंभीर गुन्ह्यामध्ये त्यास यापुर्वी पोलिसांनी अटकही केली होती़ तसेच २०१३ मध्ये त्यास शहरातून दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते़
सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास गणेश चांगले हा शहरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती़ या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश चांगले यास सापळा लावून अटक केली ़ गुन्हे शोध पथकातील महिला सहायक पोलीस निरीक्षक अहिराराव, पोलीस नाईक पळशीकर, पोलीस शिपाई खरपाडे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली़

 

Web Title: Ganesh Goodas arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.