चांदवडच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:50 PM2018-09-09T18:50:58+5:302018-09-09T18:51:23+5:30
पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हा संदेश समाजापर्यंत पोहचावा या हेतुने चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पर्यावरण पुरक शाडूमातीपासुन गणेशमुर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पाचवी ते नववीच्या १४० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन लाडक्या गणपती बाप्पाच्या सुबक मुर्ती साकारल्या.
Next
कार्यशाळेचे हे आठवे वर्ष असून विद्यार्थ्यांना कलाशिक्षक के.व्ही.अहिरे यांनी मार्गदर्शन केले. यात पाणी व शाडू मातीचे प्रमाण लक्षात घेऊन गोळा कसा तयार करावा, त्या गोळ्यापासून गणेशमुर्तीचे आधी आसन, पाय, पोट, डोके, सोंड ,कान इत्यादी अवयव तयार करण्याचे , मातीला गुळगुळीत करणे अशी प्रात्यक्षिके यावेळी करुन दाखविण्यात आली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून आकर्षक गणेशाची पाटावर -सिंहासनावर बसलेल्या, मुकूट, फेटा, पगडी ,चंद्र कोर घातलेल्या तसेच नागधारी, जय मल्हार ,बाल गणेश अशा आकर्षक गणेशाची विविध रु पे साकारली.