गणेशमूर्ती विक्रेत्यांना दुष्काळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:53 PM2018-09-15T15:53:28+5:302018-09-15T15:53:40+5:30
देवळा : चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकर्यांची नाराजी, गणेश मुर्तींच्या वाढलेल्या किंमतींचा फटका गणेशमूर्ती विक्र ेत्यांना बसला असून तोटा खाउन मुर्ती विकण्याची वेळ ह्या विक्रेत्यांवर आली. गतवर्षापेक्षा गणेशमूर्तींच्या विक्रि त 40 ते 50 टक्के घट झाली आहे. गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.
देवळा : चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकर्यांची नाराजी, गणेश मुर्तींच्या वाढलेल्या किंमतींचा फटका गणेशमूर्ती विक्रेत्यांना बसला असून तोटा खाउन मुर्ती विकण्याची वेळ ह्या विक्र ेत्यांवर आली. गतवर्षापेक्षा गणेशमूर्तींच्या विक्रि त 40 ते 50 टक्के घट झाली आहे. गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.
देवळा शहरात दरवर्षी दहा ते बारा व्यापारी गणेशमूर्ती विक्र ीचा व्यवसाय करतात. यासाठी ते रस्त्यालगत दर्शनी भागात आपली गणेशमूर्तीची दुकाने थाटतात. ह्या दुकानदारांची नियमति गिर्हाईके त्यांच्याकडून गणेशमूर्ती घेतात. यामुळे हया दुकानदारांना गणेशमूर्ती विक्रि साठी आणावयाच्या संख्येचा नेमका अंदाज असतो. त्या हिशोबाने ते दरवर्षी गणेशमूर्ती मागवतात. दुष्काळी परिस्थिती असेल तर गणेशमूर्तींच्या विक्रि त वाढ होते असा त्यांचा नेहमीचा अनुभव असल्यामुळे चालू वर्षातील कमी पर्जन्यमान पाहता गणेशमूर्तींच्या विक्रि त वाढ होईल ह्या अपेक्षेने त्यांनी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती मागवल्या. परंतु त्यांचा अंदाज चुकला, गणेश मुर्तींची समाधानकारक विक्रि झाली नाही. तीन चार दिवस आधी मुर्तीची बुकिंग करणारे नियमति गिर्हाईकांनी मुर्तीचे आगाउ बुकिंग केले नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत फारसे गिर्हाईक फिरकले नाही. त्यानंतर दुकानांमध्ये गर्दी झाली. एवढया मोठ्या प्रमाणात आणलेल्या मुर्ती विक्र ीसाठी मिळालेला कमी कालाविध व गिर्हाईकांचा अभाव यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात मुर्ती शिल्लक राहील्या. ह्या गणेशमूर्ती विक्रि केल्या नाहीत तर वर्षभर सांभाळाव्या लागणार होत्या. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असत्या. अखेर नाईलाजास्तव हया विक्र ेत्यांना तोटा सहन करत मिळेल त्या दरात गणेशमूर्तीची विक्रि करावी लागली. गिर्हाईकांना मात्र स्वस्तात गणेशमूर्ती मिळाल्यामुळे ते मात्र खुषीत होते.
बेरोजगारीची समस्या ग्रामीण भागात सातत्याने वाढत आहे. तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांनी कमाई मिळण्याच्या अपेक्षेने भांडवलाची गुंतवणुक करीत बसस्थानक, पाच कंदील परीसरात गणेशमूर्ती विक्रि चे नवीन स्टॉल हया वर्षी सुरू केले. ह्या स्टॉल्सची संख्या 40 पर्यंत पोहोचली. दरवर्षी दहा ते बारा स्टॉल लागत होते तेथे गणेशमूर्ती विक्रि चे चाळीस स्टॉल सुरू झाल्यामुळे त्याचाही विक्र ीवर परीणाम झाला.मागणीपेक्षा पुरवठा अधिक असा प्रकार झाल्यामुळे सर्वच विक्र ेत्यांना त्याचा फटका बसून तोटा सहन करावा लागला.