मुक-बधिर मुलांसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 02:27 PM2019-08-29T14:27:06+5:302019-08-29T14:27:23+5:30

येवला : येवल्याचा गीता परिवारातर्फे गुरूवारी सकाळी समता प्रतिष्ठान ही संस्था चालवित असलेल्या मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयातील सुमारे ५० मुक-बधिर मुला-मुलींसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली.

Ganesh idol workshop for deaf children | मुक-बधिर मुलांसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा

मुक-बधिर मुलांसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा

googlenewsNext

येवला : येवल्याचा गीता परिवारातर्फे गुरूवारी सकाळी समता प्रतिष्ठान ही संस्था चालवित असलेल्या मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयातील सुमारे ५० मुक-बधिर मुला-मुलींसाठी गणेशमूर्ती कार्यशाळा घेण्यात आली.
बालपणापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, त्यांची कल्पकता व सुप्त कौशल्यांचा विकास व्हावा आणि ही मुले अपंग असली तरी तीही सामान्य मुलांसारखीच हरहुन्नरी असतात हे सा-या जगाला समजावे ,हा मुख्य उद्देश ठेवून ही कार्यशाळा घेतल्याचे गीता परिवाराच्या सोनाली कलंत्री,सोनल राठी,वंदना राठी, मिनल काबरा,वंदना राठी, सोनाली आट्टल, ,माधुरी आट्टल,शैला काबरा,शुभांगी सदावर्ते आदींनी यावेळी सांगितले. याप्रसंगी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी गीता परिवारामुळेच या दिव्यांग मुलांना आपली आयुष्याची वाट सुखकर करता येणार असल्याचे गौरवोद्गार काढले. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे,हेमंत पाटील,सुकदेव आहेर, मंदा पडवळ,विलास कोकाटे,रेखा दुनबळे,सलिल पाटील,नितीन कदम,रावसाहेब सोनवणे, मारु ती पगारे, विजय जाधव,सुजीत बारे,तुषार कोतकर आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ganesh idol workshop for deaf children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक