गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता तपोवनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:10 AM2018-07-29T00:10:00+5:302018-07-29T00:10:21+5:30

दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे.

Ganesh idols are now available in the shop! | गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता तपोवनात !

गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता तपोवनात !

Next

नाशिक : दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे.  गणेशोत्सवाच्या सुमारे पंधरा दिवस अगोदरपासून शहरात गणेशमूर्ती विक्रीला येऊ लागतात. परंतु मुख्यत्वे करून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात. त्यावरून वाद होत असतो. सदरचा भाग शांतता क्षेत्र आहे. परंतु त्याठिकाणी दुकाने थाटल्यानंतर पोलीस प्रशासन महापालिकेकडे बोट दाखवते आणि प्रशासन राजकीय दबावाला बळी पडते. शहरातील काही मोजके राजकीय नेते याठिकाणी परस्पर मंडप बांधून दुकाने विक्रेत्यांना भाड्याने देतात. तथापि, रस्त्यावरील गाळे हा वादाचा विषय ठरल्यानंतर असे नेते चोख भूमिका बजावून गाळ्यांना संरक्षण देतात.  सदरची गणेशमूर्ती गाळ्यांना मुळातच गोल्फ क्लब मैदान (इदगाह मैदान) येथे जागा देण्यात आले होते. मात्र एकदा गणेशोत्सवाच्या दरम्यान रमजान ईद आल्याने अडचणीचे कारण पुढे केले गेले आणि त्यावेळी विके्रत्यांना रस्त्यावर दुकाने भरविण्यास मुभा दिली गेली. दरवर्षी या जागेवर स्टॉल उभारण्यामुळे होणार वाद हा शहरात चर्चेचा विषय ठरत असतो.  त्यातून सुरुवातीला ताणतणाव निर्माण होत असला तरी त्यानंतर वातावरण निवळते हा आजवरचा अनुभव
आहे. तथापि, यंदा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अगोदरच सदरचे गाळे हे तपोवनातील मोकळ्या जागेवर भरविण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्याचे वृत्त आहे.
महापालिकेत आता एकच गणपती
नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी सहा विभागांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र प्रथमच केवळ राजीव गांधी भवनात एकच गणपती असणार आहे, असे समजते. बी. डी. भालेकर येथील मैदानात सध्या ई-पार्किंगचे काम सुरू असून, त्यामुळे येथील देखावे अन्यत्र हलविण्याच्या आयुक्तांच्या सूचनेमुळे हा वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील मानाचा गणपती असलेला नाशिक महापालिकेच्या गणपती प्रतिष्ठापनेविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांना आयुक्तांनी मुख्यालयात गणपती उत्सव कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Ganesh idols are now available in the shop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.