गणेशमूर्ती बाजारात दाखल
By admin | Published: August 31, 2016 10:04 PM2016-08-31T22:04:34+5:302016-08-31T22:05:38+5:30
ओझर : पेण,अहमदनगर,खेडगाव,कुंभारी येथील मूर्तींना मागणी
ओझर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाने परिसरातल उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.
येथील बाजारपेठेत मूर्तीची मोठी उलाढाल होत असते. ओझर येथे पेन, अहमदनगर, संगमनेर, खेडगाव, कुंभारी या ठिकाणांहून मूर्ती विक्रीसाठी येतात. यात मुख्यत: प्लॅस्टर आफ पॅरिस आणि शाडूच्या मूर्ती असतात. त्यातदेखील तरुणाईमध्ये सेलिब्रिटी बाप्पाची विशेष मागणी असते. मागील वर्षी जसे जय मल्हार आणि बाहुबलीच्या पेहराव असलेल्या मूर्तींनी भूरळ घातली होती. त्याच प्रमाणे यंदा यावर्षीदेखील बाजीराव मस्तानी, नटसम्राट बाजारात दाखल झाले आहेत. लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपती सर्वात लोकप्रिय आहे. येथील बाजारात प्रकर्षाने दिसते; परंतु आता अनेक पर्यावरणप्रेमी कुटुंब इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य देत आहे व लोकांमध्ये जाऊन जनजागृती करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाववाढ तब्बल वीस टक्क्यांनी वाढली आहे. मूर्ती बनवण्याच्या साहित्यात प्रचंड वाढल्यामुळे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण याची सरळ झळ सामान्य भक्ताला बसणार आहे. ओझरमध्ये तयारीने वेग घेतला असून, परिसरात मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. (वार्ताहर)