देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:11 PM2019-04-16T17:11:11+5:302019-04-16T17:11:17+5:30

कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.

 Ganesh Mandals and activists in the city are known for their services to the devotees | देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले

देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले

Next
ठळक मुद्देमहाराजा कला व क्र ीडा सांस्कृतिक मित्रमंडळाने कळवणमार्गे जाणाऱ्या देवीभक्तांसाठी पाववडा वाटपाची परंपरा यंदादेखील कायम ठेवली आहे. महाराजाचा पाववडा देवीभक्तांना भुरळ घालत असल्याने देवीभक्तांनी एकच गर्दी केली आहे.

कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या औषधे, पोहे, पाणी वाटप केले जात आहे.
महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक सतीश पगार, राज देवरे, नीलेश कायस्थ, राहुल पगार, संदीप पगार, बापू जाधव, शांताराम सोनवणे, नाना देवघरे यांच्या उपस्थितीत सकाळपासून हजारो देवीभक्तांना मोफत पाववडे वाटप करण्यात आले. यावेळी निंबा पगार, संदीप पगार, राहुल पगार, नीलेश कायस्थ, केदा जाधव, शांताराम सोनवणे, प्रसाद उपासनी, किसान नेते गणपत पगार, संजय देवघरे, गुड्डू पगार, संजय देवरे आदींनी यात सहभाग घेतला. कळवण शहरात व नांदुरी मार्गावर ठिकठिकाणी देवी भक्तांच्या सेवेसाठी विविध मंडळांकडून सेवा केली जात आहे.

Web Title:  Ganesh Mandals and activists in the city are known for their services to the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.