येवला शहरासह तालुक्यात गणेश विसर्जन शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:01 PM2020-09-02T16:01:36+5:302020-09-02T16:03:03+5:30
येवला : शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील घरगुती गणेश मंडळांसह शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही नागरीकांनी घरीच तर काहींनी कृत्रीम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रीम तलाव व मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडले. शहरातील घरगुती गणेश मंडळांसह शहर पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. काही नागरीकांनी घरीच तर काहींनी कृत्रीम कुंडात श्री गणेशाचे विसर्जन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रीम तलाव व मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
परंपरेप्रमाणे शहरातील प्रथम मानाचा कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या श्री गणेशाचे दुपारी विसर्जन झाले. या प्रसंगी तालीम संघाचे राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, चेतन लोणारी, मुकेश पाटोदकर आदी उपस्थित होते. तर शेवट विसर्जनाचा मान असलेला परदेशपुरा तालीम संघाच्या श्री गणेशाचे सायंकाळी साडे पाच वाजता विसर्जन झाले.
या प्रसंगी तालीम संघाचे दिपक परदेशी, मंगल परदेशी, संजय जाधव, तकदीर परदेशी, माणिकलाल परदेशी, कैलास परदेशी, कुंदन परदेशी, संतोष परदेशी, बंटी भावसार, योगेश परदेशी आदी उपस्थित होते.
तालुक्यातील १८ गावांमध्येही सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. या गावातही ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी व मूर्ती संकलनासाठी व्यवस्था केलेली होती.
बाभुळगाव येथील कोरोना अलगीकरण कक्षातही एका रूग्णाच्या इच्छेखातर श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. अलगीकरण कक्षातील रूग्ण व कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी यासाठी या श्री गणेशाचे विसर्जन केले गेले नाही.
येवला शहरातील न्यु डिस्को फ्रेंड सर्कलने श्री गणेशोत्सवा निमित्ताने येवला फेस्टीवलचे आयोजन केले होते. याअंर्तगत अन्नदान पाकीटे, मास्कवाटप, पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षारोपण व वृक्षवाटप, कोरोना साथीच्या आजाराविषयी जनजागृती आदी उपक्र म राबविले.