नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती
By अझहर शेख | Published: September 7, 2022 03:22 PM2022-09-07T15:22:19+5:302022-09-07T15:22:45+5:30
कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे.
नाशिक - यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असून जिल्ह्यातील ग्रामिण भागात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक २५१ सार्वजनिक लहान-मोठे गणपती असून संपुर्ण जिल्हाभरात २ हजार ९०५ गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामिण पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे.
कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे. यामुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्यात गणेशमंडळांची संख्या जास्त आहे.
१ हजार ३०३ मोठी आणि ६८८ लहान मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यापैकी २६४ गणपती निफाडमध्ये आहेत. ग्रामिण पोलिसांच्या निफाड विभागात एकुण ६०७ मंडळांचा गणेशोत्सवात सहभाग आहे. यामध्ये सिन्नरमध्ये १४५ तसेच वावीत ४० आणि एमआयडीसीमध्ये ३९ मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८४९ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.
दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दल आणि ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त केला जात आहे. निफाड, येवला, मालेगाव, मनमाड, सिन्नरमध्ये सर्वाधिक बंदोबस्त नियुक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस ठाणे- एक गाव गणपती
इगतपुरी - १४
घोटी - २६
वाडीवऱ्हे - १०
ओझर - ०४
पिंपळगाव - ८
त्र्यंबकेश्वर - २८
पेठ- ५९
हरसुल- -४९
बाऱ्हे - ४१
सुरगाणा- ५८
नाशिक तालुका - १०
सायखेडा - २२
सिन्नर - १५
लासलगाव - १५
कळवण - ४९
अभोणा - ४६
दिंडोरी- ४६
वणी - २६
येवला - ४१
चांदवड - २१
नांदगाव - ४३
सटाणा - ४७