गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे

By admin | Published: August 27, 2016 10:53 PM2016-08-27T22:53:01+5:302016-08-27T22:53:45+5:30

रवींद्र सिंघल : गणेश मंडळ प्रमुखांची बैठक

Ganeshotsav mandals should obey the law | गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे

गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे

Next

नाशिक : गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळांच्या प्रमुखांच्या बैठकीत केले़
पोलीस मुख्यालयातील ग्रीन बॅरेकमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांनी मर्यादांचे पालन करून सहकार्य करावे़ आवाजाची मर्यादा सांभाळण्याबरोबरच मौल्यवान गणेशमूर्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मंडळांची असून, त्यासाठी सुरक्षिततेच्या उपायोजना करणे गरजेचे असल्याचे सिंघल यांनी सांगितले़
पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळजबरीने वर्गणी वसूल करणाऱ्या मंडळांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला़
या गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस प्रसन्न तांबट, सत्यम खंडाळे, विजय काकड, पोपट नागपुरे, मिलिंद वाघ, हेमंत जगताप, रोहन पवार आदिंसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ganeshotsav mandals should obey the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.