गणेशोत्सव मित्र मंडळाने राबविला सामाजिक उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:01 PM2018-09-20T18:01:27+5:302018-09-20T18:01:57+5:30
ओझर : नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी, ओझरच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या सदस्यांनी स्वत:च्या वाढदिवसाचा खर्च टाळून ज्या शेतकºयांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केलेली आहे. अशा गरीब शेतकºयांच्या घरातील एका मुलाचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च पेलण्याचा संकल्प केला आहे. त्या उपक्र माचा शुभारंभ बुधवारी (दि.१९) नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मुलींला १५०० रु पयांचा चेक व शालेय वस्तू देऊन करण्यात आला.

नाशिक ग्रामीण अप्पर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय अधिकारी अतुल झेंडे यांनी ओझरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने एच.ए.एल हायस्कूल मराठी माध्यमाच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू सोबतच स्पोर्ट्स साहित्य वाटप करण्यात आले. तसेच या गणेशोत्सव काळात मंडळाकडून रक्तदान शिबीरासह, यावर्षी गणेशोत्सव मंडळाना जिल्ह्यातील मंडळांसाठी पोलीस ठाणे, विभागीय तसेच जिल्हास्तरीय विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केली. या मंडळाने संपूर्ण विघ्नहर्ता योजनेच्या ठरवुन दिलेल्या नियमावली प्रमाणे मूर्ती स्थापनाच्या दिवशी ‘डीजे’ हे वाद्यला फाटा देत ढोल ताशात आगमन सोहळा काढण्यात आले. यावर्षी ओझरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने ओझर येथील एच.ए.एल हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेत शपथ घेऊन स्वच्छतेचे उपक्र म राबविण्यात आला. तसेच शालेय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. यावर्षी घरोघरी वृक्षारोपीका वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक नानासाहेब मंडलिक, सह मार्गदर्शक अरु ण लोहकरे, चंद्रशेखर असोलकर, आनंद खैरे, संस्थापक अध्यक्ष मित्तल मंडलिक, अध्यक्ष चेतन सोनवणे, उपाध्यक्ष संदीप लढ्ढा मंडळाचे सदस्य गोपाल लढ्ढा, मकरंद मंडलिक, अजय लुटे, किरण गडाख, मयूर मंडलिक, आकाश जाधव, प्रशांत पानगव्हाने, नितीन जंजाळे, योगेश सोनवणे, विवेक खापरे, गणेश धिँगाणे, तुषार नाईक, मंगेश मंडलिक, रोहन रास्कर, सुनील मंडलिक, ऋ षिकेश झोडगे, चेतन परदेशी, विशाल मंडलिक, आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी मंडळाच्या वतीने एच.ए.एल हायस्कूल मराठी माध्यमाच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू सोबतच स्पोर्ट्स साहित्य वाटप करण्यात आले.
शिरवडे वणी येथील जान्हवी मनोज गायकवाड या मुलीच्या वडिलांनी घरची परिस्थिती हालाकीची शेतीवर कर्ज असल्याने ते फेडण्यासाठी पैसेही नव्हते, अखेर सदर शेतकरी मनोज गायकवाड यांनी ११ मार्च २०१६ रोजी वयाच्या ३२ वर्षी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.