वाहने चोरणाºया टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:57 AM2020-02-04T00:57:28+5:302020-02-04T00:58:07+5:30
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात छेºयाच्या बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी (पिकअप) चोरून नेणाºया व स्पेअर पार्टची विक्री करणाºया पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन महिंद्रा पिकअप, स्पेअर पार्ट असा १३ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात छेºयाच्या बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी (पिकअप) चोरून नेणाºया व स्पेअर पार्टची विक्री करणाºया पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन महिंद्रा पिकअप, स्पेअर पार्ट असा १३ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१८ जानेवारी रोजी नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक कृष्णकुमारसिंग चंद्रशेठसिंग, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश हे महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप डिलिव्हरी देण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून धुळेकडे जात असताना टेहरे शिवारात कारमधून आलेल्या अज्ञात चौघा आरोपींनी पिकअप चालकाला छेºयाचा बंदुकीचा धाक दाखवून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली होती.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदवड येथील गोरख अशोक गांगुर्डे याला ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सुनिल गोविंद डगळे रा. खेडगाव, ता. दिंडोरी, रोहित जयराम गांगुर्डे, रा. औताळे, ता. दिंडोरी, निरंजन तुळशिराम मंगळे रा. ओझर टाऊनशिप या चौघांनी पिकअप चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली व्हॅन, स्पेअरपार्ट, दोन महिंद्रा पिकअप असा १३ लाख ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम, संदिप लगड, भूषण रानडे आदिंनी ही कारवाई केली.पिकअपचे स्पेअर पार्ट विकल्याचे तपासात उघडगोरख गांगुर्डे व सुनील डगळे हे दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटला विक्री करण्यासाठी पिकअपवर चालक म्हणून काम करीत होते. या दोघांनी महिंद्रा कंपनीचे परराज्यात जाणारी वाहन चोरण्याची योजना आखली होती. चोरलेल्या पिकअपचे स्पेअर पार्ट संशयित आरोपींनी आपसात वाटून घेतली होती. त्यापैकी गाडीची ट्रॉली अनिल विष्णू चौरे, रा. शिरसगाव, ता. निफाड यांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी विष्णू चौरे यांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुनील डगळे यांनी चोरी केलेले पिकअप गाडीचे टायर व डिस्क त्याच्या मालकीच्या पिकअप (क्र. एमएच १५ जीव्ही ५४३७) या वाहनाला बसविल्याचे उघडकीस आले आहे.