झेलम एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:08 AM2019-08-14T01:08:56+5:302019-08-14T01:09:32+5:30
रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेस सुरू होताच प्रवासी महिलेची पर्स हिसकावून पलायन करणाºया सहा भामट्यांना जेरबंद करण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मनमाड: रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेस सुरू होताच प्रवासी महिलेची पर्स हिसकावून पलायन करणाºया सहा भामट्यांना जेरबंद करण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पवनकुमार रामकिशन कामरा हे झेलम एक्स्प्रेसने एसी कोच ए- २ मधून दिल्ली ते अहमदनगर असा प्रवास करत होते. गाडी मनमाड स्थानकात थांबली असता कामरा यांच्या पत्नी कोमल बोगीतील दरवाज्याजवळील वॉश बेसीनजवळ फ्रेश होत असताना त्यांनी त्यांची पर्स आपल्या पतीकडे दिली. त्याचवेळी गाडी स्थानकावरून निघाली असता दरवाजात उभ्या असलेल्या पाच ते सहा जणांनी पर्स हिसकावून गाडीतून उडी घेत पलायन केले. याबाबत कामरा यांनी गाडीत ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार गुरसळ यांना माहिती दिली. त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली असता तपसाची चक्रे फिरण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेल्वे बुकिंग कार्यालयाजवळ या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ४० हजार रुपये रोख व ५ हजार रुपयांची पर्स असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी राजा अरमुगम, सुब्रमण्यम नागाप्पम सरवाई, सत्यासेलन महेंद्रन, कुमारसेन सेल्वराज, मुर्ती सुंदर सरवाई, मदनकुमार महेंद्रन सरवाई (सर्व, रा. पुगनूर, तिरुचीरापल्ली) यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला़