टोळी जेरबंद

By admin | Published: August 5, 2016 12:24 AM2016-08-05T00:24:16+5:302016-08-05T00:24:24+5:30

वणी-सापुतारा रस्ता : ट्रक चालकांना लुटणाऱ्या चौघांना अटक

Gang marsh | टोळी जेरबंद

टोळी जेरबंद

Next

 वणी : वणी व सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल व धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रकचालकांना लुटणाऱ्या टोळीचा नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पाच संशयितांच्या मुसक्या आवळत झायलो कारसह पाच लाख ३४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आठ दिवसात दरोड्याचा छडा लावण्यात आला.
२५ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास वणी - सापुतारा रस्त्यावर चिखली शिवारात घाटाच्या चढणावर ट्रक (क्र. आरजे २७ जीए ७९२१ हीस झायलो गाडीतून आलेल्या संशयितानी ट्रकमधील चालक व क्लीनर यांना मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवून १६ हजार ३०० रुपये रोख, टेपरेकॉर्डर तसेच ट्रकच्या दोन बॅटऱ्या असा एकूण २६ हजार ८०० रु पयांचा ऐवज दरोडा टाकून लुटला होता. याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोनच दिवसांनी मध्यरात्री वणी -सापुतारा रस्त्यावर वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या झायलो गाडीतील संशयितांनी ट्रक अडवून त्यातील संशयितांनी सुरा व पिस्तूलचा धाक दाखवून सात हजार रु पये रोख व दोन मोबाइल हॅण्डसेट टेपरेकॉर्डर असा एकूण ९५०० रुपयांचा ऐवज लुटला होता. त्याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी या घटनांची तत्परतेने गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना याप्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)

Web Title: Gang marsh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.