परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:56 PM2019-04-08T17:56:43+5:302019-04-08T17:59:06+5:30
लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रूपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापुर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
नाशिक : शहरात आठवडाभरापुर्वी एकाच दिवशी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच पध्दतीने वाहनचालकांच्या लूटीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांमधील लूटीचे कारण एकसमान असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या यापक्ररणी आवळल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘तुमच्या वाहनातून आॅइल गळती होत आहे’, असे सांगून वाहनचालकांचे लक्ष विचलीत करून वाहनामध्ये ठेवलेल्या रोकड व महागड्या वस्तूंच्या बॅग लंपास करण्याच्या घटना काही दिवसांपुर्वी शहरात घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, दिल्ली येथील पाच संशियतांना पथकाने अटक केली. यामध्ये संजय मुनियांदी (३०), बबलू फकीरा (३५), किसन सेलूराज (३०), करण गणेश (३०), अभिमन्यु बबलू (१९, सर्व रा. दिल्ली) यांच्यासह एक अल्पवयीन संशियताचा या टोळीत समावेश आहे. यांच्यासह एका अल्पवयीन संशियतास सहायक पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने शिर्डीमधून ताब्यात घेतले आहे. लुटारूंच्या टोळीने आगळीवेगळी शक्कल लढवून भरदिवसा हजारो ते लाखो रूपयांची लूट करण्याचा सपाटा लावला होता. पंधरवड्यापुर्वीच सरकारवाडा, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गुन्ह्यांसह औरंगाबादमधील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून अशाप्रकारचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--
पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल
गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांची कसून झडती घेत त्यांच्याकडून मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील चांडकसर्कलवर घडलेल्या गुन्ह्यातील ७०ग्रॅम सोन्याच्या दोन पाटल्यांसह सरकारवाडा हद्दीतील गुन्ह्यातील रोख रक्कमेपैकी ५९ हजाराची रोकड, २ आॅईल बॉटल, १ कुलंट बॉटल, लहान रंगाचा डबा, ५मोबाईल असा एकूण ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.