चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:33 PM2020-01-20T18:33:34+5:302020-01-20T18:34:08+5:30

इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहे.

A gang of mobile thieves arrested in the hands of passengers on a moving train | चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

Next
ठळक मुद्देइगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलिसांची कारवाई ; तिघे ताब्यात

लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहे.
रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी इगतपुरीतील निसर्गरम्य देखावे व कसारा घाटातील धबधबे आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्यासाठी गाडीच्या दरवाजा व खिडकीतुन हातात मोबाईल धरून फोटो व चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून मोबाईल चोरी करणाºया अनेक टोळ्या कार्यरत झाल्या असुन आज पर्यंत हजारो प्रवाशांचे मोबाईल चोरीस गेले आहेत.
मात्र बरेच प्रवाशी लांब पल्लाचा प्रवास असल्याने व गाडी जास्त वेळ थांबत नसल्याने तक्र ार देत नाहीत. त्यामुळे या टोळयांचे चांगलेच फावले आहे.
याबाबत रेल्वे पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की तुषार रमेश पवार, राहणार दिंडोरीरोड, नाशिक. हे तपोवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बसून नांदेड ते मुंबई असा प्रवास करीत असताना इगतपुरी येण्याचे अगोदर बोरटेंभे पुलाजवळ सदर ट्रेन हळुजात असताना, चोरट्यांनी पवार यांच्या हाताला झटका देऊन त्यांचा मोबाईल पळविला.
याबाबत त्यांनी इगतपुरी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिस व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास मोहीम राबविली त्यात राहुल रमेश साळवे, (मिलिंद नगर इगतपुरी, सध्या रा. घोटी), ललित सदाशिव मोरे (मिलिंद नगर, इगतपुरी), विशाल दत्ता आतकरी (बोरटेंभे, इगतपुरी) या तिघाना रेल्वे पोलिसांनी अटक करून कस्टडी देण्यात आली.
त्यांच्याकडून नोकीया, सॅमसंग, ओपो, विवो, एमआय, लावा, रियलमी आदी कंपनीचे सुमारे १६ मोबाईल (अंदाजे किंमत दोन लाख) व शस्त्र हस्तगत करण्यात आले. संशयितांपैकी राहुल साळवे याच्यावर घोटी पोलीस ठाणे, इगतपुरी पोलीस ठाणे व इगतपुरी रेल्वे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.
लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैभव कलूबर्मे, मनमाड रेल्वे उपअधीक्षक विलास मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, इगतपुरी रेल्वे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, हेमंत घरटे, अंबादास कातोरे, दीपक निकम, दिपक निकम, सतीश खर्डे आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले असून पुढील तपास करत आहे.

प्रवाशांनी रेल्वेतुन प्रवास करतांना दाराजवळ ऊभे राहुन किंवा खिडकीतुन हातात मोबाईल घेऊन फोटो अथवा शुटींग करू नये.
ङ्क्त- सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे.

Web Title: A gang of mobile thieves arrested in the hands of passengers on a moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.