पाथर्डी फाट्यावर टोळक्याकडून तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:23 AM2018-12-31T01:23:19+5:302018-12-31T01:23:35+5:30
मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली.
नाशिक : मित्राचा पत्ता न सांगितल्याचा राग आलेल्या चौघा संशयितांनी एका तरुणास चाकू व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर घडली.
ज्ञानेश्वर कापसे (२६, लेखानगर, सिडको) या तरुणाने अंबड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़२७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो पाथर्डी फाट्यावरील रिक्षा स्टॅण्डवर उभा होता़ यावेळी संशयित दीपक भारूडकर हा आपल्या तीन साथीदारांसह आला़ त्याने
मायकल कुठे आहे, अशी विचारणा केली असता कापसे याने
सांगता येणार नाही, असे सांगितले़ याचा राग येऊन संशयितांनी चाकू व दगडाने जबर मारहाण केली़
यामध्ये जखमी झालेल्या कापसेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़
पोलीस कॅन्टीनसमोरून
दुचाकीची चोरी
सुचितानगरमधील रहिवासी मधुकर शार्दुल (५६, रा़ फ्लॅट नंबर ७, रविराज रेसिडेन्सी) यांनी आपली २५ हजार रुपये किमतीची काळ्या
रंगाची हिरो होंडा दुचाकी (एमएच १५, सीएल ०४७७) सीबीएसजवळील सद्भावना पोलीस कॅन्टींगसमोर
पार्क केली होती़ सोमवारी
(दि़२४) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाईक महाविद्यालयातून
दुचाकीची चोरी
गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातील रहिवासी सुभाष निघुते (४४, रा़ तिरुपती टॉवर) यांनी आपली २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी (एमएच १७, एआर १६८९) व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती़ शुक्रवारी (दि़२८) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़
तरुणाचा मोबाइल लंपास
४भद्रकालीतील कोकणीपुरा येथील रहिवासी अकबर शेख (२२) या तरुणाच्या खिशातील ९ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा मोबाइल जय मल्हार वडापाव सेंटरजवळून चोरट्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अल्पवयीन
मुलीचे अपहरण
राजीवनगर परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि़२९) सायंकाळच्या सुमारास घडली़ अपहृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मुलगी घराबाहेर पडली ती परतलीच नाही़ तिचा इतरत्र शोध घेऊनही न सापडल्याने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला़